सुमित्रा काकू गेल्या तीन वर्षांपासून Paithani विणत आहेत. साडी विकण्यासाठी त्यांनी 7 Placements Strategy योग्य प्रकारे राबवली नाही. Ads वर कितीही पैसे घातले तरी विक्री होणार नाही.
त्यांच्या हातातला धागा बोलतो. प्रत्येक मोर इतका नाजूक, की बघताना डोळे थांबतात. त्यांनी Instagram वर account केलं. Photos टाकल्या. एक दोन Reels पण केल्या. मग धाडस करून Ads केल्या आणि दोन हजार रुपये पाण्यात गेले. विक्री? शून्य.
“माझं product चांगलं नाही का?” हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला.
त्याचं उत्तर आहे, product उत्तम आहे. पण एक गोष्ट चुकली. प्रोडक्ट विकण्यासाठी ७ Placements Strategy प्लॅन करायला त्या विसरल्या.
Customer एकदा पाहून विकत घेत नाही
Marketing मधला Rule of 7 सांगतो — customer तुमचं product किमान ७ वेळा पाहिल्याशिवाय खरेदीचा निर्णय घेत नाही. हे Brand visibility आणि trust बांधण्यासाठी आवश्यक आहे.
पण इथे महत्त्वाची गोष्ट आहे — 7 वेळा म्हणजे एकच जाहिरात 7 वेळा दाखवणं नाही. तर ७ वेगळ्या ठिकाणी, 7 वेगळ्या प्रकारे तुमचं product दिसणं, यामुळे ओळख मिळते, विश्वास वाढतो, आणि मग conversion होतो.
सुमित्रा काकूंची चूक इथेच झाली. त्यांनी थेट Step 7 — म्हणजे Ads — वर पैसे घातले. पण Step 1 ते 6 अजून सुरूच नव्हते.
हे 7 Steps कोणते? चला पाहूया.
Placement 1 — Content च्या Background मध्ये
सर्वात सोपं, subtle पण सर्वात powerful placement, म्हणजे खूप महत्त्वाचं आहे
समजून घेऊया. तुम्ही एखादा cooking video करताय, किंवा घरातला एखादा moment share करताय. त्या background मध्ये तुमची Paithani साडी दिसतेय. Customer ला directly सांगितलेलं नाही — पण नजर गेली. मन नोंद घेतलं.
हे natural आहे. Forced नाही. आणि म्हणूनच trust निर्माण करतं.
सुमित्रा काकूंसाठी: रोजच्या Reels मध्ये background ला loom वर Paithani दिसू द्या. जर लूम नसेल तर इतर जनरल रील मध्ये पैठणीचा वापर, वावर दिसू द्या. ते सांगायची गरज नाही फक्त दिसू द्या.

Placement 2 — Influencer किंवा प्रतिष्ठित व्यक्तीने वापरणे
एकाच platform वर राहिल्यास exposure मर्यादित राहतो. वेगवेगळ्या channels वर, विविध लोकांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एकच brand ची उपस्थिती नोंदवल्यास brand आठवणीत राहतो.
एखाद्या local Marathi influencer ने, सामाजिक कार्यकर्तीने, किंवा तुमच्या शहरातल्या आदरणीय व्यक्तीने तुमची साडी नेसली. साडी नेसल्यामुळे त्यांनी एक simple post टाकली तर हे एक placement.
मोठ्या celebrity ची गरज नाही. तुमच्या target customer च्या मनात ज्यांचा आदर आहे ती व्यक्ती पुरेशी आहे.

Placement 3 — WhatsApp Groups मध्ये
हे महाराष्ट्रात सर्वात underrated placement आहे, यावर शक्यतो सर्व दुर्लक्ष करतात.
तुमचे target customers कोणत्या WhatsApp groups मध्ये आहेत? फेसबुकच्या कोणत्या ग्रुप मध्ये आहेत? महिला मंडळ, लग्नाचे planning groups, Marathi cultural groups — इथे तुमच्या साडीची genuine माहिती पोहोचवा. जाहिरात नको, एखाद्या satisfied customer ने स्वतःहून share केलेली post पुरे असते.
हे placement खरं तर, Word of mouth चा digital avatar आहे.

Placement 4 — Podcast वर उल्लेख
Repeated exposure brand recognition वाढवतो आणि sales conversion improve करतो — हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा brand वेगवेगळ्या माध्यमांत दिसतो.
एखाद्या Marathi podcast वर — fashion, culture, business, किंवा lifestyle — तुमच्या craft बद्दल बोला. स्वतः जा, किंवा कोणाला तरी तुमच्याबद्दल बोलायला सांगा.
Podcast ऐकणारा listener concentrate करतो. तो distracted नसतो. हे नीट ऐकल्यामुळे हे brand placement खूप खोलवर जातं

Placement 5 — Substack Newsletter मध्ये उल्लेख
Maharashtra मध्ये fashion, culture आणि lifestyle वर लिहिणारे newsletter असतात. त्यांच्याशी connect व्हा. त्यांनी त्यांच्या subscribers ना तुमच्या साडीबद्दल सांगितलं तर हे एक qualified placement ठरेल.
Newsletter subscribers हे active readers असतात, ते deliberately वाचतात. त्यामुळे हे placement high quality आहे.

Placement 6 — Reddit, Quora, Facebook, Instagram
कोणीतरी Quora वर विचारतं, “अस्सल Paithani कुठे मिळते?” — आणि तिथे तुमचं नाव येतं. Facebook group मध्ये कोणी तुमच्या साडीबद्दल genuine review लिहितं. Instagram च्या comment section मध्ये तुमचा उल्लेख होतो.
हे organic conversations असतं. Customer तुम्हाला पहिल्यांदा पाहून trust करत नाही, repeated, consistent presence मुळे trust तयार होतो. विविध platforms वर तुमची उपस्थिती हीच trust ची पहिली पायरी आहे.

Placement 7 — Performance Marketing Ads
आता Facebook किंवा Google वर, YouTube वर, Instagram वर paid advertising करू शकता.
पण हे लक्षात ठेवा — Visibility conversion च्या आधी येते. लोक तुम्हाला पुरेसं पाहिल्याशिवाय तुमच्या प्रॉडक्ट वर भरोसा करत नाहीत आणि भरोशाशिवाय खरेदी होत नाही.
Placement 1 ते 6 सुरू असताना customer Placement 7 येतो. Customer म्हणतो — हे मी brand आधी पाहिलं होतं. चल आता घेतोच.
ही conversion घडवून आणण्याची process आहे.
सुमित्रा काकूंचं पुढे काय झालं?
त्यांनी Ads बंद केल्या. Background मध्ये साडी दाखवायला सुरुवात केली. एका local Marathi influencer ला साडी gifted केली. महिला मंडळाच्या WhatsApp group मध्ये एका satisfied customer ने photo share केली.
तीन महिन्यांनी Ads परत लावल्या — आणि यावेळी results वेगळे आले. साड्यांची मागणी वाढली, सगळं सुरळीत सुरू झालं.
निर्णय
तुमची साडी, तुमची Kolhapuri चप्पल, तुमचं कोणतंही handmade product — ते उत्तम आहे हे गृहीत आहे. पण उत्तम product एकट्याने विकलं जात नाही. प्रोडक्ट विकण्यासाठी ७ Placements Strategy गरजेची आहे.
ते आधी 7 ठिकाणी दिसायला हवं. 7 वेळा आठवायला यायला हवं. मग customer स्वतःहून येतो. तुमचं प्रत्येक product योग्य ठिकाणी पोहोचेल — फक्त ७ पावलं योग्य क्रमाने टाका. 🧡
Brand Maratha वर Maharashtra च्या handmade brands च्या journey बद्दल अधिक वाचा, click करा — विणकर ते ब्रँड — Vansaj Handloom ची गोष्ट इथून सुरुवात करा.









