प्रिया गेल्या महिन्यात एक सुंदर ethnic kurta set घेऊन आली. रंग छान होता. फॅब्रिक उत्तम होतं. किंमत ही व्यवस्थित होती. घालून पाहिले, आरशात बघितलं — आणि काहीतरी आत खटकलं. “बरं दिसतंय, पण… wow नाही.”
लग्नाला गेली. Photos काढले, पण तिला स्वतःलाच वाटलं — “हे outfit उठावदार दिसत नाही. “चूक कपड्यांची नव्हती. चूक होती रंगांच्या balance ची आणि 60-30-10 Formula Ethnic Wear साठी कसा वापरायचा हे माहीत नव्हतं म्हणून
60-30-10 Rule म्हणजे काय?
हा Formula मुळात interior design मधून आला आणि आता fashion मध्ये सर्वात reliable styling tool म्हणून वापरला जातो. 60% dominant colour, 30% complementary tone, आणि 10% accent — हे तीन proportions मिळून एक visually balanced, look तयार करतात.
थोडक्यात, 60% — तुमचा मुख्य रंग. outfit चा base. 30% — त्याला साथ देणारा रंग. depth आणि interest. 10% — एक छोटासा bold accent. attract करणारा रंग.
हे तीन रंग मिळून outfit ठरवून स्टाईल केल्यासारखे वाटते — balance दिसतो — आणि “she just threw it on” असा effortless confidence येतो.
हा formula रोजच्या कपड्यांसाठी किती perfect आहे, ते आता बघूया.
Ethnic Wear मध्ये 60-30-10 कसा वापरायचा?
60% — तुमचा Kurta किंवा Outfit

हा तुमच्या look चा anchor point आहे. Ethnic wear मध्ये Kurta, Anarkali, Co-ord set, किंवा Saree चा मुख्य रंग असतो.
हा dominant colour outfit चा base किंवा basic tone असतो — तो सर्वात जास्त दिसतो.
उदाहरण: Deep teal kurta set — हा तुमचा 60% आहे.
30% — Dupatta किंवा Bottom
हा रंग 60% मोठ्या रंगाला depth देतो. हा 30% रंग Contrast असला तर उत्तम लुक येतो, complementary असला तरी चालतो — पण एकाच colour स्कीम मधले नको.
एकाच colour scheme मधले कपडे टाळा — म्हणजे look ५०-५० दिसतो. तेव्हा outfit बघणाऱ्याला confusion होतो — नजर कुठे स्थिर करायची हे कळत नाही.
उदाहरण: Deep teal kurta सोबत off-white किंवा rust orange dupatta — हा तुमचा 30% आहे.

10% — Accessories, Jewellery, Footwear
हा सर्वात छोटा पण सर्वात powerful भाग आहे.
10% म्हणजे तो छोटासा pop off रंग — जसे की एक bold bag, statement earrings, किंवा bright heels — जे पूर्ण look ला activate करतो.
Ethnic wear मध्ये हे असू शकतं — Statement earrings, oxidized necklace, Kolhapuri chappal एखाद्या bold shade मध्ये, किंवा clutch.
उदाहरण: Deep teal kurta + off-white dupatta + terracotta Kolhapuri chappal आणि gold jhumkas — हा complete 60-30-10 look आहे.
Ethnic Wear साठी काही Ready Combinations
Bold आणि confident look साठी — emerald green, royal blue, किंवा deep red हे dominant colours powerful असतात. Statement outfit साठी हे रंग नजर थांबवतात.
Combo 1 — Festival Look: 60% Mustard yellow kurta set, 30% Ivory white dupatta, 10% Maroon jhumkas + maroon mojris
Combo 2 — Wedding Guest Look: 60% Wine anarkali, 30% Blush pink dupatta, 10% Gold statement necklace + nude heels
आणि Combo 3 — Casual Ethnic Look: 60% Sage green co-ord kurta set, 30% Beige palazzo, 10% Oxidized silver earrings + tan Kolhapuri

Heavy embroidery असलेल्या outfit मध्ये accessories minimal ठेवा — outfit सोबत एक्सेसरीज किंवा ज्वेलरी वाढवून स्पर्धा करू नका. Simple earrings आणि elegant footwear — पुरेसं आहे.
एक महत्त्वाची गोष्ट
हा formula guide म्हणून वापरायचा आहे. Fashion म्हणजे self-expression आहे — आणि 60-30-10 formula त्याला structure देतो. तुमचा mood, तुमची personality, तुमचं occasion हे सगळं फॉर्मुलामुळे सेट करतं.
आज आरशासमोर उभं राहा. तुमचा outfit बघा. 60% रंग कोणता? 30% रंग कोणता? 10% pop off कलर कोणता आहे?
जर तिन्ही नसतील — तिथेच उत्तर आहे “काहीतरी कमी आहे” याचं.
निर्णय
Stylist महागडा असतो. पण 60-30-10 Formula — हा formula free आहे. कुठल्या ही outfit मध्ये हा formula वापरला की outfit आपोआप intentional वाटतो. बघणारा observe करतो आणि तुम्हाला स्वतःला वाटतं — “आज wow दिसत असणार.”
अजून सहज समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा:
Maharashtra च्या authentic ethnic wear च्या जगात डोकावायचं असेल तर Brand Maratha store explore करा — जिथे प्रत्येक outfit तुमच्या 60% साठी ready आहे. आणि Ethnic look साठी perfect footwear हवं असेल तर कोल्हापुरी चप्पल बद्दल वाचा — तुमचा 10% ची स्टाईल पूर्ण करणार आहे. 🧡
या बद्दल तुम्हाला माहीत आहे का?
- कोल्हापुरी चप्पल का टोचते ? इथे वाचा: Kolhapuri Chappal वर क्लिक करा
- Online Shopping मध्ये फसवणूक कशी टाळावी? इथे वाचा: Online Shopping वर क्लिक करा









