गुढीपाडवा येतो आनी तरुण मुलांमध्ये चर्चा सुरू होते “काय घालणार?” उत्तर एकच — “कुर्ता-पायजमा.”
पण थांबा एक मिनिट. मराठी पुरुषांचा traditional wardrobe फक्त कुर्ता-पायजमा पुरता मर्यादित नाही. शतकांपूर्वी पेशव्यांच्या दरबारात, मराठा साम्राज्याच्या काळात, Maratha warriors च्या घरात, वेगळेच, अस्सल Maharashtrian outfits होते.
ते आज जवळजवळ सर्वच विस्मृतीत गेले आहेत.
आज त्यातील 3 outfits जाणून घेऊया, जे कुर्त्यापेक्षा खास आहेत, authentic आहेत आणि आज पण घालता येतात.

1. बाराबंदी (Barabandi) — महाराष्ट्रीय परंपरेचा राजेशीर थाट
बाराबंदी हा शब्द ऐकला की जुना Maharashtra डोळ्यासमोर येतो.
बाराबंदी म्हणजे काय?
“बारा” म्हणजे बारा — “बंदी” म्हणजे बांधणे. हा एक wrapचा प्रकार आहे. हे वस्त्र परिधान करताना, आतील बाजूच्या कापडाला 6 गाठी बांधल्या जातात आणि बाहेरील वस्त्राला पक्के करताना 6 गाठी बांधल्या जातात. एकूण 12 गाठीने बांधल्यामुळे, त्याला बाराबंदी या नावाने ओळखले जाते.
त्या काळी, पारंपरिक ब्राम्हण समाजात याचा खूप वापर झाला. Mul किंवा Cambric cotton — नेहमी शुभ्र पांढरे. त्यामुळे त्याचा फील खूप comfortable आणि दिसायला ही तितकेच dignified.
इतिहास: ब्रिटिश राजवटीत बाराबंदी इतकी लोकप्रिय होती की अनेक पुरुष त्यावर western coat घालायचे — जसा आजचा blazer over shirt look असतो तसा. ब्रिटिशांच्या नंतर बाराबंदी हळूहळू मागे पडली. आज ती फक्त ऐतिहासिक नाटके किंवा अत्यंत पारंपरिक लग्नांमध्ये पाहायला मिळते.
बाराबंदी कुठे घालायची? गुढीपाडवा, दसरा, दिवाळी पहाट, वेडिंग्स — कुठेही. फेट्यासोबत घातली की look 100% authentic Maharashtrian.

2. बगलबंदी (Bagalbandi) — मराठा साम्राज्याचा पेहराव
बगलबंदी हे नाव कमी ऐकलं असेल पण हे Maharashtra च्या इतिहासाशी खोलवर जोडलेलं आहे.
बगलबंदी म्हणजे काय?
“बगल” म्हणजे शरीराची बाजू आणि “बंदी” म्हणजे बांधणे. हा एक side-tie कुर्ता आहे, म्हणजे पुढे नाही तर बाजूने बांधतात. Style मध्ये double-breasted coat सारखं दिसतं पण fabric overlaps होतं wraps सारखं आणि दोऱ्यांनी त्याला खांद्याच्या खालच्या बाजूला बांधले जाते.
बाराबंदी आणि बगलबंदी मध्ये काय फरक आहे?
बाराबंदी (Barabandi) — कुर्त्याच्या पुढे दोऱ्या (strings) असतात. आणि बगलबंदी (Bagalbandi) मध्ये खांद्याच्या खालच्या बाजूला दोऱ्या (strings) असतात — Maratha royal style.
दोन्ही वस्त्र अंगरखा (Angarkha) या broader category मध्ये येतात, त्याला wrap-style garments म्हणून ओळखले जाते.
इतिहास: बगलबंदी हे मराठा, गुजरात, राजस्थान या ठिकाणी लोकप्रिय होतं. पेशवाई काळात अनेक पुरुषांमध्ये हे वस्त्र परिधान व्हायचं. नेपाळ मध्ये हे वस्त्र दौरा (Daura) नावाने ओळखलं जातं — तिथे याला राष्ट्रीय वस्त्राचा दर्जा आहे.
कुठे घालायची बगलबंदी ? Weddings, festivals, traditional events — Dhoti सोबत हे combination royal Maharashtrian look देतं. Grooms आज पण Bagalbandi-Dhoti वर Pheta घालतात Marathi weddings मध्ये.

3. बंडी-धोतर (Bandi + Dhotar) साधं, सुंदर, Maharashtrian
बंडी हे नाव ऐकलं नसेल असं नाही पण किती जणांनी घातलं आहे?
बंडी म्हणजे काय?
सर्वसाधारणपणे आजच्या काळात बंडी स्लीव्हलेस जॅकेटला म्हटले जाते, बंडीचा खरा अर्थ एक साधा अर्ध्या हाताचा सदरा असा होतो. Cotton किंवा silk — warm climate साठी perfectly designed आहे. शतकानुशतके ही बंडी विदर्भासारख्या उष्ण ठिकाणी घातली गेली.
धोतर म्हणजे काय?
धोतर म्हणजे कमरेपासून खाली घोट्यापर्यंत, नेसलं जाणारं एक वस्त्र ज्याला drape केले जाते. नागपुरातलं कॉटन धोतर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ५ गाठी बांधण्याच्या परंपरेमुळे हा वेष सेफ आणि कम्फर्टेबल होतो.
का खास आहे हे combination?
Bandi + Dhotar हे Maharashtra च्या climate साठी सर्वात practical traditional outfit आहे. राजा-राजवाड्यांच्या महाराष्ट्रात सामान्य जनता धोतर आणि वर बंडी घालायचे. आणि राजे-महाराजे बाराबंदी आणि बगलबंदी घालायचे.
आज? विविध सण, गणेश पूजन, फॅमिली फंक्शन, गुढी पाडवा स्वागत यात्रेसाठी — हे combination timeless आहे.
तीनही Outfits — Quick Guide
| Outfit | Style | Occasion | Vibe |
|---|---|---|---|
| बाराबंदी | Front strings | Weddings, Festivals | Royal |
| बगलबंदी | Side strings | Weddings, Formal | Maratha Warrior |
| बंडी + धोतर | Sadara + Dhoti | All Festivals | Classic Maharashtra |
आता पुढे काय?
गुढीपाडवा, दिवाळी पहाट, गणेशोत्सव, लग्नसमारंभ या सर्व ठिकाणी यापुढे कुर्ता-पायजमाच घालायचा का? की Maharashtra चा अस्सल traditional wardrobe try करायचा?
बाराबंदी, बगलबंदी, बंडी-धोतर, हे घातलं की तुम्ही फक्त dressed up नाही तुम्ही Maharashtra चा इतिहास carry करत असता.
या कपड्यांना कोणताही कुर्ता पायजमा compete करू शकत नाही. 🧡
इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा
गुढीपाडव्याला नऊवारी साडी” → 👉🏾 Ready to Wear Nauvari
कोल्हापुरी चप्पल → 👉🏾 Kolhapuri Chappal Guide
महाराष्ट्राच्या पारंपरिक कलांबद्दल” → 👉🏾 Vanishing Crafts of Maharashtra
“गुढीवर साडी का बांधतात” → 👉🏾 Gudhi Sadi Tradition
महाराष्ट्राची फॅशन क्रांती
From Roots to Runway
brandmaratha.store









