Gudhi Padwa Special: साधं, सुसंस्कृत आणि स्टायलिश
एथनिक कपडे घालायची इच्छा सगळ्यांनाच असते, पण मनात एक भीती कायम असते ती म्हणजे “जास्तच भारी तर नाही वाटणार ना?” याची. लग्न नाही, मोठा सोहळा नाही, तरी साडी, कुर्ता, दुपट्टा घातला की ओव्हर-ड्रेस्ड (overdressed) वाटेल का? हे कन्फ्युजन मिलेनियल्स आणि जेन झी मध्ये खूप कॉमन आहे.
आणि गुढी पाडवा जवळ आला की हा प्रश्न अजून वाढतो. सण आहे, उत्सव आहे, पण तरीही त्यांना त्यांचा लुक एलिगंट, फ्रेश आणि एफर्टलेस हवा असतो. चला तर मग, ओव्हर-ड्रेस्ड न वाटता एथनिक कसं दिसायचं, हे स्टेप-बाय-स्टेप पाहूया.
1. ओव्हर-ड्रेस्ड वाटण्याचं मूळ कारण काय आहे?

सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की ओव्हर-ड्रेस्ड हे कपड्यांमुळे कमी आणि स्टायलिंग चॉइस मुळे जास्त वाटत असतं.
- खूप heavy fabric
- जास्त एम्ब्रॉयडरी
- जड-जड दागिने
- ब्राईट रंगांबरोबर खूप मेकअप
- Occasion पेक्षा जास्त खटाटोप दिसून येणारा लुक
- हे सगळं एकत्र आलं की तुमचा लुक “too much” होतो. एथनिक म्हणजे सगळंच भारी असायलाच हवे, हा गैरसमज आपण आता सोडायला हवा.
2. कापडाची (Fabric) निवड = 50% लूक ठरतो
गुढी पाडव्यासाठी किंवा रोजच्या एथनिक वेअरसाठी कापड (fabric) फार महत्त्वाचा आहे.
ओव्हर-ड्रेस्ड टाळायचं असेल तर या फॅब्रिक्सची निवड करा:
- कॉटन
- कॉटन सिल्क
- लिनन (Linen Blends)
- कोणते ही मऊ हॅंडलूम (Soft Handlooms), हे फॅब्रिक नैसर्गिकरित्या एलिगंट दिसतात. या फॅब्रिकचे कपडे घातल्याने ते एलिगंट दिसण्यासाठी जास्त effort लागले आहेत असं जाणवत नाही, आणि तरी क्लासी लुक येतो.
3. रंगसंगती (Colour Palette) साधी ठेवा, पण डल नाही

एथनिक वेअर मध्ये रंग खूप बोलके असतात. पण ओव्हर-ड्रेस्ड न वाटण्यासाठी बैलेंस गरजेचा आहे.
सेफ पण स्टायलिश रंगाचे कपडे घ्या:
- Off-White, Cream, Ivory
- Pastel Shades
- Mustard, Rust, Bottle Green
- Soft Maroon, Indigo
गुढी पाडव्याच्या आपल्या लूकसाठी पिवळा, हिरवा, पांढरा या ट्रेडिशनल रंगांचा वापर करा, पण म्युटेड टोन मध्ये ट्राय करा.
4. ‘वन स्टेटमेंट’ हा नियम लक्षात ठेवा
हा सगळ्यात प्रॅक्टिकल नियम आहे. एकाच गोष्टीला हायलाईट करा:
- Heavy Earrings असतील → इतर दागिने मिनिमल ठेवा
- रिच फॅब्रिक असेल → हलका मेकअप करा
- प्रिंटेड साडी असेल → ब्लाऊज एकाच रंगाचा, साधा परिधान करा
लक्षात ठेवा ‘Everything Screaming At Once = Overdressed! As Only One Thing Shines‘. लुक मधल्या इतर गोष्टी सपोर्टसाठी असायला हव्या, हाच क्लासी लुक असणार आहे, ट्राय करून पाहा.
5. Kurta & Bottom Wear: Fit Matters
कुर्ता किती सुंदर आहे यापेक्षा तो फिट बसतोय हे जास्त महत्त्वाचं.
- Perfect fit (खूप लूज नाही, खूप घट्ट नाही)
- Straight Pants, Palazzo किंवा Cigarette Pants
- भारदस्त दुपट्टा दूर ठेवा, हलक्या रंगाचा कॉटन दुपट्टा चालणार आहे.
गुढी पाडव्यासाठी शॉर्ट कुर्ता + लाँग स्कर्ट किंवा स्ट्रेट कुर्ता + पँट्स हा खूप फ्रेश लुक आहे.
6. Jewellery: एथनिक म्हणजे भारदस्त नाही
हा सगळ्यात कॉमन ट्रॅप आहे. या पेक्षा पुढील प्रमाणे यंदाच्या गुढी पाडव्याला ट्राय करा.
- Silver Studs / झुमके (Jhumkas)
- Single Statement Ring
- पातळ बांगड्या
- नेकलेस ऑप्शनल ठेवा. कारण कधी-कधी न घालणं हे सुद्धा स्टाईल असू शकतं.
7. HMU: हेअर आणि मेकअप : हे एफर्टलेस असायला पाहिजे

Overdressed लूकमध्ये makeup मोठी भूमिका बजावतो.
- फेस मेकअप आधी करा (Skin-first)
- ओठांसाठी Nude lips किंवा soft colour लिपस्टिक शेड्स
- एकतर काजल किंवा लायनर, दोन्ही एकत्र नाही
- केस शक्यतो नॅचरल ठेवा, No Heavy Styling
गुढी पाडवा म्हणजे नवचैतन्य, ताजेपणा, ओव्हर-ड्रेस्ड, जडपणा नाही.
8. Ethnic = Occasion-Specific असलेच पाहिजे असं नाही
स्पेशल Occasion, उदाहरणार्थ लग्न, एंगेजमेंट, यासाठी हेवी लूक ठीक आहे पण सगळीकडे एथनिक वेअर हा Heavy असायलाच पाहिजे, या विचारातून आपण बाहेर पडूया. हा सगळ्यात मोठा माईंडसेट शिफ्ट आहे. एथनिक कपडे कसे असतात:
- जे रोज घालता येतात
- जे ऑफिसमध्ये क्लासी लुक आणतात
- कॉलेज मध्ये ही कॉन्फिडेंट वाटतात
- सणासुदीला लाईट एथनिक लुक Effortless Elegance देतात
जेव्हा एथनिक वेअर “Special Occasion Only” असणार नाही, तेव्हा आपला लुक ओव्हर-ड्रेस्ड वाटणं आपोआप कमी होतं.
Brand Maratha Perspective
ब्रँड मराठासाठी एथनिक फॅशन म्हणजे शो-ऑफ नाही, तर ती आपली ओळख आहे. Rooted असणं म्हणजे Outdated हा गैरसमज आहे आणि मॉडर्न असणं म्हणजे आपली परंपरा सोडणं असं ही नाही.
गुढी पाडवा हा नवा आरंभ आहे. नवीन वर्षाची सुरुवात करताना आपला लुक फ्रेश आणि ऑथेंटिक असू द्या.
एकूणच काय तर:
Overdressed न वाटता एथनिक दिसायचं असेल तर heavy होण्याची गरज नाही. साधेपणा, योग्य स्टायलिंग आणि भरपूर आत्मविश्वास पुरेसा आहे.
गुढी पाडवा व इतर सणांसाठी नव्या युगाचा एकच मंत्र लक्षात ठेवा
“Less effort. More grace.” ![]()










Comment (1)
[…] सूट होणारे रंग कसं ओळखायचे? […]