White Dominant Outfit with Contrast Red Skirt wore by a beautiful girl with styled formula of 60-30-10 Brand Maratha is looking extremely beautiful

Outfit boring वाटतोय? 60-30-10 Rule वापरून perfect look मिळवा

प्रिया गेल्या महिन्यात एक सुंदर ethnic kurta set घेऊन आली. रंग छान होता. फॅब्रिक उत्तम होतं. किंमत ही व्यवस्थित होती. घालून पाहिले, आरशात बघितलं — आणि काहीतरी आत खटकलं. “बरं दिसतंय, पण… wow नाही.”

लग्नाला गेली. Photos काढले, पण तिला स्वतःलाच वाटलं — “हे outfit उठावदार दिसत नाही. “चूक कपड्यांची नव्हती. चूक होती रंगांच्या balance ची आणि 60-30-10 Formula Ethnic Wear साठी कसा वापरायचा हे माहीत नव्हतं म्हणून


60-30-10 Rule म्हणजे काय?

हा Formula मुळात interior design मधून आला आणि आता fashion मध्ये सर्वात reliable styling tool म्हणून वापरला जातो. 60% dominant colour, 30% complementary tone, आणि 10% accent — हे तीन proportions मिळून एक visually balanced, look तयार करतात.

थोडक्यात, 60% — तुमचा मुख्य रंग. outfit चा base. 30% — त्याला साथ देणारा रंग. depth आणि interest. 10% — एक छोटासा bold accent. attract करणारा रंग.

हे तीन रंग मिळून outfit ठरवून स्टाईल केल्यासारखे वाटते — balance दिसतो — आणि “she just threw it on” असा effortless confidence येतो.

हा formula रोजच्या कपड्यांसाठी किती perfect आहे, ते आता बघूया.

Ethnic Wear मध्ये 60-30-10 कसा वापरायचा?

60% — तुमचा Kurta किंवा Outfit

A Beautiful Girl Brand Maratha Wearing Teal Dress and Jhumka Jewellery with Red Dupatta is looking in mirror with WOW effect.jpg

हा तुमच्या look चा anchor point आहे. Ethnic wear मध्ये Kurta, Anarkali, Co-ord set, किंवा Saree चा मुख्य रंग असतो.

हा dominant colour outfit चा base किंवा basic tone असतो — तो सर्वात जास्त दिसतो.

उदाहरण: Deep teal kurta set — हा तुमचा 60% आहे.

30% — Dupatta किंवा Bottom

हा रंग 60% मोठ्या रंगाला depth देतो. हा 30% रंग Contrast असला तर उत्तम लुक येतो, complementary असला तरी चालतो — पण एकाच colour स्कीम मधले नको.

एकाच colour scheme मधले कपडे टाळा — म्हणजे look ५०-५० दिसतो. तेव्हा outfit बघणाऱ्याला confusion होतो — नजर कुठे स्थिर करायची हे कळत नाही.

उदाहरण: Deep teal kurta सोबत off-white किंवा rust orange dupatta — हा तुमचा 30% आहे.

60 30 10 Formula Explained for Perfect Balanced Styling A beautiful Marathi Girl wearing Teal Kurta Rani Pink Dupatta and Statement Jewelry Brand Maratha is high with confidence

10% — Accessories, Jewellery, Footwear

हा सर्वात छोटा पण सर्वात powerful भाग आहे.

10% म्हणजे तो छोटासा pop off रंग — जसे की एक bold bag, statement earrings, किंवा bright heels — जे पूर्ण look ला activate करतो.

Ethnic wear मध्ये हे असू शकतं — Statement earrings, oxidized necklace, Kolhapuri chappal एखाद्या bold shade मध्ये, किंवा clutch.

उदाहरण: Deep teal kurta + off-white dupatta + terracotta Kolhapuri chappal आणि gold jhumkas — हा complete 60-30-10 look आहे.


Ethnic Wear साठी काही Ready Combinations

Bold आणि confident look साठी — emerald green, royal blue, किंवा deep red हे dominant colours powerful असतात. Statement outfit साठी हे रंग नजर थांबवतात.

Combo 1 — Festival Look: 60% Mustard yellow kurta set, 30% Ivory white dupatta, 10% Maroon jhumkas + maroon mojris

Combo 2 — Wedding Guest Look: 60% Wine anarkali, 30% Blush pink dupatta, 10% Gold statement necklace + nude heels

आणि Combo 3 — Casual Ethnic Look: 60% Sage green co-ord kurta set, 30% Beige palazzo, 10% Oxidized silver earrings + tan Kolhapuri

Combination for Ethnic Wear as per 60 30 10 Rule of Balancing the Outfit Colours for Wow Effect.jpg

Heavy embroidery असलेल्या outfit मध्ये accessories minimal ठेवा — outfit सोबत एक्सेसरीज किंवा ज्वेलरी वाढवून स्पर्धा करू नका. Simple earrings आणि elegant footwear — पुरेसं आहे. 


एक महत्त्वाची गोष्ट

हा formula guide म्हणून वापरायचा आहे. Fashion म्हणजे self-expression आहे — आणि 60-30-10 formula त्याला structure देतो. तुमचा mood, तुमची personality, तुमचं occasion हे सगळं फॉर्मुलामुळे सेट करतं.

आज आरशासमोर उभं राहा. तुमचा outfit बघा. 60% रंग कोणता? 30% रंग कोणता? 10% pop off कलर कोणता आहे?

जर तिन्ही नसतील — तिथेच उत्तर आहे “काहीतरी कमी आहे” याचं.


निर्णय

Stylist महागडा असतो. पण 60-30-10 Formula — हा formula free आहे. कुठल्या ही outfit मध्ये हा formula वापरला की outfit आपोआप intentional वाटतो. बघणारा observe करतो आणि तुम्हाला स्वतःला वाटतं — “आज wow दिसत असणार.”

अजून सहज समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा:

Maharashtra च्या authentic ethnic wear च्या जगात डोकावायचं असेल तर Brand Maratha store explore करा — जिथे प्रत्येक outfit तुमच्या 60% साठी ready आहे. आणि Ethnic look साठी perfect footwear हवं असेल तर कोल्हापुरी चप्पल बद्दल वाचा — तुमचा 10% ची स्टाईल पूर्ण करणार आहे. 🧡


या बद्दल तुम्हाला माहीत आहे का?

  • कोल्हापुरी चप्पल का टोचते ? इथे वाचा: Kolhapuri Chappal वर क्लिक करा
  • Online Shopping मध्ये फसवणूक कशी टाळावी? इथे वाचा: Online Shopping वर क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Your cart is currently empty!.

You may check out all the available products and buy some in the shop.

Continue Shopping
Add Order Note
Estimate Shipping