विदर्भातील पौनी गावात एक विणकर, नाव रमेश माने. रमेश गेली पंधरा वर्षे करवत काठी साड्या विणतात. Tussar silk, Pit loom, तीन shuttles, हे सगळं त्याला डोळे मिटून येतं. त्यांच्या साडीची border म्हणजे कलाकारी. रामटेक मंदिराच्या शिल्पांमधून प्रेरित temple motifs — एका साडीत घडवणे,हे आश्चर्य त्यांच्या कलेत आहे.
पण रमेश आज आपल्या साड्या कुठे विकतात ?
शासकीय Indrayani showroom मध्ये. वर्षातून एखाद्या प्रदर्शनाला. तोच तो खरेदीदार, तीच ती किंमत, त्यावर exhibition मध्ये साड्या विकल्या जात नाही असं मिश्किलपणे म्हणायची सवय.
रमेशकडे कला आहे. पण Brand नाही.
अशा वेळी एक प्रश्न पडतो — रमेशने ठरवलं की ‘वनसाज हँडलूम’ हा brand उभारायचा — तर त्यांनी काय करायला हवं?
हे फक्त रमेशसाठी नाही. हे त्या प्रत्येकासाठी आहे जो Instagram वर साड्या विकतो पण brand नाही. Exhibition मध्ये stall लावतो पण नाव नाही. MFW मध्ये participate केलं पण पुढे काय ते कळत नाही. Design करतो पण market reach नाही.
मग ब्रँड बनवण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे ?
पहिली गोष्ट — ओळख निश्चित करा
रमेशने आधी पहिला प्रश्न सोडवायला हवा “माझा brand कशासाठी ओळखला जाणार?”
‘वनसाज हँडलूम’ म्हणजे काय? फक्त Karvat Kathi — विदर्भ, महाराष्ट्र, Tussar silk मध्ये. बस.

एक craft, एक region, एक identity.
ही Paithani नाही, यात Nauvari नाही — फक्त Karvat Kathi. हे specialization brand ला strength देतं. जो सगळं करतो, त्याला कोणी लक्षात ठेवत नाही. जो एकच गोष्ट perfectly करतो, त्याला जग ओळखतं.
दुसरी गोष्ट — Product ला गोष्ट द्या
Karvat Kathi साडी म्हणजे काय?
जसे कुर्त्यांमध्ये नाव “बारा” नाही — “बाराबंदी” आहे, कारण त्याला बारा गाठी मारून बंद केले जाते. तसंच Karvat Kathi म्हणजे उगाच ठेवलेले नाव नाही.
विदर्भातील विविध मंदिराच्या शिल्पांमधून प्रेरणा घेतलेले temple motifs, Tussar silk आणि pit loom वर तीन shuttles वापरून विणलेली ही साडी — विदर्भाच्या वधूची पारंपरिक ओळख आहे.
एक साडी विणायला दोन ते तीन आठवडे लागतात. हे रमेशने सांगायला हवं. प्रत्येक साडीसोबत एक छोटी card द्यायला हवं, त्यावर लिहायला हवं — “ही साडी विणायला 18 दिवस लागले. विणकर: रमेश माने, पौनी, विदर्भ, महाराष्ट्र.”
Product नाही — गोष्ट विकायची आहे.
तिसरी गोष्ट — Digital ओळख उभारा
Instagram page काढा — ‘vansajhandloom’ लवकरात लवकर. रोज एक गोष्ट share करा — विणताना video, धागा निवडताना photo. साडी पूर्ण झाल्यावर reel.
असं असू शकतं की इंस्टाग्राम वर लोकांना साडी घ्यायची नसेल, पण गोष्ट पाहायला सगळ्यांना आवडते.
View this post on Instagram
तुमच्या बद्दल, प्रॉडक्ट बद्दल गोष्ट पाहूनच इंस्टाग्राम वर फॉलोअर्स वाढतील, पण Instagram followers म्हणजे brand नाही. पण Instagram शिवाय आज brand ही नाही.
Website नंतर करा. आधी Instagram. आधी सोशल presence वाढवा.
चौथी गोष्ट — Marathi Fashion Week मध्ये सहभाग घ्या
रमेशला Marathi Fashion Week कसं help करेल?
मराठी फॅशन वीक हा एक असा मंच आहे, जिथे फक्त डिझायनर्सना नाही तर तळगळातल्या विणकरांना सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वस्त्रांच्या गौरवाची कथा सांगणाऱ्या या फॅशन वीक मध्ये विणकरांना हे फायदे होऊ शकतात.

Credibility — MFW मध्ये participate केलेला brand म्हणजे verified होण्यास मदत होतो. सेलिब्रिटीने वॉक केल्यामुळे, तुमच्या साड्यांबद्दल खरेदीदाराला विश्वास वाटू शकतो.
Network — इथे designers, buyers, media, bloggers एकत्र असतात. काही दिवसात connections होतात जे वर्षभरात होत नाहीत.
Visibility — MFW चे photos, Reels, coverage — ‘वनसाज हँडलूम’ चं नाव digital world मध्ये सर्वदूर दिसू लागतं.
Validation — “मी MFW मध्ये fashion show केला” — हे वाक्य brand ला 10 पटींनी मोठं करतं.
कारण मराठी फॅशन वीक हे फक्त runway नाही हे मराठी वस्त्रकलेवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक launch pad आहे.

पाचवी गोष्ट — Timeline ठरवा
Phase 1 — पहिले 6 महिने: Brand Foundation साठी द्या: Brand नाव ठरवा, logo तयार करा, तुम्ही हे कसे केले, का केले या माहितीला धरून brand story तयार करा. Instagram page वर रोज जरी नसले तरी आठवड्यातून 3 वेळ post करा. पहिले 12 products तयार केल्यावर तुमच्या साड्यांची product photography professional असणं अत्यंत गरजेचं आहे. WhatsApp वर आपल्या साड्यांचा catalogue तयार करा. पहिले 10-20 orders ओळखीतून येतील. हे 6 महिने इतर काही करायची घाई नको — brand base मजबूत असेल तर पुढे सर्व छान उभे राहील.
Phase 2 — 6 ते 12 महिने: Presence Instagram वर सातत्य आणा — Reels सुरू ठेवा. 2-3 local exhibitions जसे की Pune, Mumbai, Nagpur यात स्टॉल्स मध्ये प्रॉडक्ट आणि ब्रँड दिसू द्या. पहिले media mention — local Marathi newspaper, YouTube channel वर येऊ द्या. 30-50 orders झाल्यावर Customer reviews घ्या — हे सर्वात मोठं asset आहे. हे reviews इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकायला सुरू करा.
Phase 3 — 12 ते 18 महिने: मराठी ब्रँड्स साठी उत्तम असा Platform Marathi Fashion Week साठी apply करा, हे फॅशन वीक प्रत्येक सहा महिन्यातून एकदा होत असते — participation plan करा. स्वतःची Website launch करा, साधी, सोपी Marathi आणि English एकत्र. Brand Maratha सारख्या platforms वर आपले listing करा. इथे ब्रँड मोठं करण्यासाठी जमेल तशी मदत केली जाते. इतर इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर आपला ग्राहक विखुरलेला आहे, आणि आपण काही लाखात एक होऊन बसल्यामुळे त्या प्लॅटफॉर्म वर ग्राहक मिळणे कठीण होते, ब्रँड मराठा वर मराठी ग्राहक येत असल्याने आपल्याला हवा असलेला ग्राहक मोठ्या संख्येने इथे उपलब्ध आहे आणि इथे ब्रँड मोजके असल्याने आपली ओळख निर्माण होण्यास मदत होते. orders milestone ठरवा, Brand Maratha च्या इतर branding activity मध्ये सहभागी होत रहा, Brand value वाढवत रहा. आपला Brand Incubate म्हणजेच वाढताना पहा.
Phase 4 — 18 ते 24 महिने: Credibility MFW participation झाल्यावर press coverage येईल. Pan-Maharashtra exhibitions जसे की नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर मध्ये सहभागी व्हा, तिथे MFW बद्दल सांगून, Brand Stories सांगून inquiries मिळवायचा प्रयत्न करा. inquiries येतील — धीराने handle करा. Brand story documented करण्यासाठी video, blog, interviews यावर काम करा.
Phase 5 — 24-36 महिन्यांनंतर: Scale Marathi diaspora म्हणजे आंतरराष्ट्रीय मराठी बाजारपेठ यांच्यापर्यंत कसे पोहोचू, एक्सपोर्ट्स चा अभ्यास करा — NRI buyers पर्यंत पोहोचा. Export inquiry handle करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या. आता Team वाढवायला सुरू करा — 1 ते 2 लोकांपासून सुरू करा. Pan-India presence target करा.
सतत लक्षात ठेवायच्या गोष्टी
Quality कधीच compromise करू नका. Powerloom Karvat Kathi साडी handloom म्हणून विकण्याचा प्रकार industry मध्ये होतो. रमेशने हे कधीच करायचं नाही. एक खोटी साडी brand संपवते.
किंमत कमी करू नका. हातमागावर विणलेली साडी महाग असते — कारण ती 18 दिवसांचं काम आहे. किंमत कमी केली की craft ची किंमत कमी होते.
एकट्याने करायचं नाही. Brand Maratha सारख्या इतर platforms शी जोडा. गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या Weavers societies बरोबर connect व्हा. विविध कम्युनिटी मध्ये सहभागी होऊन मार्ग काढत रहा.
गोष्ट सांगत राहा. रमेश माने, विदर्भ, महाराष्ट्र — हे नाव जगाला माहीत व्हायला हवं.
शेवटी एक गोष्ट
Karvat Kathi साडीला आज shirt, dress materials आणि dupattas पर्यंत expand केलं आहे. म्हणजे craft तयार आहे. Market तयार आहे. फक्त brand उभारायला हवा आहे.
खरं तर रमेश माने ही व्यक्ती fictional आहे. पण ज्यांची ही गोष्ट आहे, ती खरी आहे.
तुम्हाला ही ब्रँड बनवण्याची जर जिद्द असेल तर हे तुम्ही रमेश असू शकता
आणि त्यामुळे ‘वनसाज हँडलूम’ फक्त उदाहरण आहे — तुमचा brand तुम्हीच उभारायचा आहे, सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज व्हा, आणि एक भक्कम brand व्हा.
Brand Maratha आपल्या सहकार्यासाठी आहे. 🧡
महाराष्ट्राची फॅशन क्रांती , From Roots to Runway
brandmaratha.store








