A smiling woman in a vibrant orange ethnic sari with a statement necklace sits in a café setting, enjoying a meal in a bright, plant-filled space, showcasing confident everyday ethnic fashion.

Style Guide: स्वतःची स्टाईल कशी ओळखायची ?

आज फॅशन इंस्पिरेशन सगळीकडे आहे. इन्स्टॅग्राम रील, इन्फ्लुएन्सर्स, ट्रेंड्स पण तरीही अनेकांना एक प्रश्न सतत पडतो “माझी स्वतःची स्टाइल नेमकी कशी बेस्ट असेल?”

कारण आपण बहुतेक वेळा ट्रेंड फॉलो करतो, पण स्वतःला योग्य वाटणाऱ्या स्टाईलकडे पाहात नाही.Trends बदलत राहतात. पण जी स्टाईल तुमच्यावर शोभते, जी तुम्हाला कॉन्फिडेंट फील देते आणि तीच खरी टिकते.

खरं तर फॅशन मध्ये स्वतःची स्टाईल शोधणं कठीण नाही. कारण फॅशन मध्ये बरेच ऑप्शन असतात, पण स्वतःची स्टाईल सापडली तर स्टाइलिंग ऑप्शनचा गोंधळ कमी होतो.

चला, अगदी बेसिक पासून सुरुवात करूया.

स्वतःची स्टाइल शोधायची सुरुवात कुठून करायची?

सुरुवात एका साध्या प्रश्नापासून करा “माझ्यावर नेमकं काय छान दिसतं?” हे जाणून घेण्यासाठी पुढे सांगितलेल्या गोष्टी स्वतःच तपासून पहा.

1. कोणते Colours तुमच्यावर जास्त शोभतात?

Colour हा सगळ्यात पहिला गेम चेंजर फॅक्टर आहे. योग्य रंगाचे कपडे तुम्हाला फ्रेश आणि कॉन्फिडेंट फील देतं. त्यामुळे सुरुवात करताना सूट करणाऱ्या रंगावर फोकस करा.

सूट होणारे रंग कसं ओळखायचे?

  • नॅचरल लाईट मध्ये स्वताकडे बघा, कॉन्फिंडेंट वाटत असेल तर, तो रंग लक्षात ठेवा.
  • कोणत्या वेगळ्या रंगांचे कपडे घातले की लोक तुमचं कौतुक करतात यावर लक्ष द्या.
  • त्याच बरोबर खाली दिलेल्या गाईडच्या वापराने स्वतःच्या स्किन टोन फिट कलर शोधून काढा.

स्किन टोन गाईड:

  • Warm skin tone → पिवळा, मरून, रस्टी, ऑफ-व्हाईट
  • Cool skin tone → निळा, हिरवा, जांभळा
  • Neutral skin tone → बहुतेक रंग चालतात

एथनिक वेअर मध्ये अर्थी (Earthy) आणि लो सॅच्युरेशन असलेले muted colours खूप ग्रेसफुल दिसतात.

2. तुमच्यासाठी योग्य Fabric कसा ठरवायचा?

कापड किती सुंदर आहे यापेक्षा त्यात आराम वाटतो का, हे महत्त्वाचं असतं. स्वतःला काही प्रश्न विचारा:

जर आराम priority असेल, तर:

  • कॉटन
  • कॉटन सिल्क
  • लिनन (linen)
  • सॉफ्ट हॅंडलूम हे fabrics रोजच्या ethnic look साठी perfect असतात.
  • डिझाईन-हेवी फॅब्रिकचा Occasions साठी विचार करू शकता.

3. Prints तुमच्यावर शोभतात का?

सर्वांवर आणि सर्व कॉम्बिनेशन्स वर prints छान दिसतातच असं नाही, पण ते समजून घेतले तर त्यातून एक खूप बोल्ड आणि तितकाच एलिगेंट लुक निर्माण होऊ शकतो.

  • मोठे प्रिंट्स घातल्याने → bold personality दिसते
  • लहान prints → simple, क्यूट लूक दिसून येतो
  • उभ्या डिझाईनमुळे → उंच दिसायला मदत होते
  • खूप बिझी प्रिंट्स → खूप स्टायलिंगची गरज नसते

तुम्हाला जर कपड्यांवर प्रिंट्स आवडत नसतील, तर तुम्ही पुढील ऑप्शनचा विचार करून शकता,

  • प्लेन सॉलिड कलर्स
  • टेक्सचर (Textured) फॅब्रिक्स
  • बॉर्डर असलेले कपडे

आता पुढे साधा प्रश्न आहे, तुमच्या बॉडी टाईप नुसार योग्य प्रिंट्स कसे निवडायचे?

पुढे सांगितल्या प्रमाणे केल्याने कपडे आणि डिझाईन बैलेंस्ड दिसतात आणि आपली पर्सनालिटी अजून खुलून दिसते.

  • स्लिम बॉडी असल्यास  → लहान प्रिंट्स, vertical पण थोडे जाडे डिझाईन्स
  • कर्वी किंवा थोडे स्थूल शरीर असल्यास  → मीडियम प्रिंट्स, थोडे लांब असलेले मोटिफ चालणार आहेत.
  • Broad body frame म्हणजे रुंद शरीरयष्टी असलेले → मोठे प्रिंट्स घालू शकतात.
  • उंची कमी असलेले  → vertical pattern असलेले, लहान आणि मिडीयम आकाराचे प्रिंट्स
  • उंच व्यक्ती  → मोठे प्रिंट्स किंवा बोल्ड प्रिंट्स घालू शकतात

प्रिंट्स जर खूप heavy असतील तर या गोष्टीवर लक्ष द्या,

  • ज्वेलरी मिनिमल ठेवा
  • मेकअप हलका ठेवा
  • कपड्यांचे फिटिंग योग्य ठेवा

4. Fit: सगळ्यात दुर्लक्षित पण महत्त्वाची गोष्ट

कपडे महाग असो वा स्वस्त ते नीट बसले नाहीत, तर लूक खराब होतो. मग योग्य फिट म्हणजे नक्की कसं असायला पाहिजे:

  • खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, चालताना-बसताना आरामदायक
  • परफेक्ट फिट असलेला साधा kurta सुद्धा चुकीच्या फिटिंगचा डिझायनर कपड्यांपेक्षा जास्त स्मार्ट दिसतो.

5. Accessories कशा निवडायच्या?

एथनिक लूक मध्ये accessories कमी असल्या तरी चालतात, पण योग्य असायला हव्यात. स्वतःला विचारा, मला साधं आवडतं ? की एक बोल्ड एक्सेसरी असावी असं वाटतं ?

साधे नियम लक्षात ठेवा:

  • मिनिमल आवडत असेल → छोटे earrings, बांगड्या
  • स्वतःचं स्टेटमेंट दाखवायला आवडत असेल → एकच बोल्ड एक्सेसरी परिधान करू शकता
  • सगळं एकत्र घालणं म्हणजे स्टाईल नाही. त्याचा योग्य बैलेंस म्हणजे स्टाईल.

6. Sunglasses सुद्धा स्टाइलचा भाग आहेत

हो, एथनिक लूक साठीही सन ग्लासेस स्टाईल स्टेटमेंट असतात हे आता नव्याने सांगायची गरज नाही. पण कोणते ग्लासेस आपल्याला सूट करतात ते शोधायचं लॉजिक फार सोपं आहे.

  • गोल चेहरा → चौकोनी frames
  • टोकदार निमुळता किंवा उभा चेहरा → राऊंड frames
  • लहान चेहरा → फार मोठे sunglasses शक्यतो टाळा
  • उत्तम सन ग्लासेस आपल्या स्टाईलला फिनिश देतात.

आपल्या लाईफस्टाइलला मॅच होणारी स्टाईल निवडा, अशी स्टाईल जी तुम्ही रोज घालू शकता, त्यातील कपडे तुम्ही रिपीट करू शकता, आणि रोजच्या स्टाईल मध्ये तुम्हाला स्पेशल occasionची वाट पहायची गरज नाही. एथनिक कपडे जेव्हा रोजच्या आयुष्यात बसतात, तेव्हा ओव्हरड्रेस्ड वाटणं आणि ट्रेंड्सच्या गर्दीतला trend fatigue आपोआप कमी होतो.

Brand Maratha साठी फॅशन म्हणजे trend chase नाही तर ती ओळख आहे. एथनिक फॅशन म्हणजे जुनाट नाही आणि मॉडर्न फॅशन म्हणजे आपले roots सोडणं नाही. जेव्हा कपडे तुमच्या पर्सनालिटी वर शोभून दिसतात, तेव्हा ते fashion नसून statement असतात.

शेवटी एवढंच

स्वतःची स्टाइल शोधणं म्हणजे वेगळं दिसण्याचा हट्ट नाही कारण ते स्वतःला ओळखणं आहे. ट्रेंड्स येतील-जातील. पण जी स्टाईल तुमच्यावर शोभते, जी तुम्हाला कॉन्फिडेंट फील देते, तीच खरी फॅशन आहे आणि आजच्या काळात, ट्रेंड फॉलो न करणं हेच सर्वात Stylish आहे Brand Maratha Icon carrying saffron colour with pride.


www.brandmaratha.store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Your cart is currently empty!.

You may check out all the available products and buy some in the shop.

Continue Shopping
Add Order Note
Estimate Shipping