कधी असा अनुभव आलाय का तोच रंग दुसऱ्यावर खूप सुंदर दिसतो, पण confidence असून ही, त्या लुक मध्ये काहीतरी off वाटतं? बरेच Outfit महाग असतात, Design छान असतात. तरी आरशात बघताना Glow जाणवत नाही.
बहुतेक वेळा problem कपड्यांचा नसतो तर Problem असतो Skin Tone आणि मॅचिंगचा. Skin tone म्हणजे फक्त गोरा, सावळा किंवा गव्हाळ नाही. त्वचेचा एक बेस टोन असतो, जसे की warm, cool किंवा neutral टोन आणि कपड्यांचे रंग त्यावर वेगवेगळे दिसतात. हा फरक समजला, की styling खूप सोपं आणि power styling होऊ शकतं.
1. आधी तुमचा Skin Tone ओळखा
रंग निवडण्याआधी स्वतःच्या स्किन टोन समजून घेतला पाहिजे, त्यासाठी पुढे तीन टेस्ट्स सांगितल्या आहेत, ज्याने तुम्हाला तुमचा स्किन टोन समजायला मदत होईल, करून पहा.
(a) Vein Test: मनगटावरची रक्त वाहिनी
आपल्या मनगटावर असलेली रक्तवाहिनी प्रकाशात बघा, त्याचे रंग नीट पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या स्किन टोनचा अंदाज येईल.
- शिरा हिरवट दिसतात → Warm tone
- शिरा निळसर दिसतात → Cool tone
- दोन्ही mix दिसतात → Neutral tone

(b) Jewellery Test: आपल्या अंगावर उठून दिसणारे दागिने
तुम्ही आजवर विविध दागिने घालून पाहिलेच असणार, पण कोणते दागिने आपल्यावर जास्त उठून दिसतात, यावरून आपला स्किन टोन कळून येतोय, ही टेस्ट घेऊन पाहा.
- सोन्याचे दागिने → Warm
- चांदीचे दागिने → Cool
- दोन्ही equally छान → Neutral

(C) Sun Reaction: उन्हाचा आपल्या त्वचेवर होणारा परिणाम
उन्हाचा आपल्या त्वचेवर होणाऱ्या परिणामामुळे आपण आपला स्किन टोन ओळखू शकतो, ही टेस्ट घेऊन पाहा
सूर्यात पटकन टॅन होता? → Warm
लालसर होतो? → Cool
या टेस्ट्स परफेक्टली साइंटिफिक नाहीत, पण स्किन टोन शोधण्यास मदत होईल हे नक्की.

2. Warm Skin Tone? हे रंग तुमच्यासाठी
आता जर तुम्हाला टेस्ट्स करून, तुमचे स्किन टोन कळले असतील तर, कोणत्या स्किन टोनसाठी कोणत्या रंगांचे कपडे उठून दिसणार हे समजून घेऊया.
भारतात सर्वसाधारण Warm Tone असणाऱ्यांची संख्या जास्त आहे, Warm Tone मध्ये त्वचेला हलका golden किंवा पिवळसर बेस असतो.
तुमच्यावर हे colours खूप natural दिसतात:
- Mustard
- Rust
- Brick orange
- Olive green
- Deep maroon
- Cream / off-white
- Warm reds
- Ethnic wear मध्ये हे colours खूप Rich आणि Festive वाटतात.
कोणते रंग Warm Tone साठी योग्य नाहीत ?
- Icy blue
- Very pale pink
- Cool grey
- Silverish white
- या रंगांमुळे तुमची पर्सनालिटी dull दिसू शकते.

3. Cool Skin Tone? हे रंग निवडा
जर तुमच्या स्किनचा Cool Tone असेल तर, Cool tone मध्ये त्वचेवर हलका गुलाबी किंवा निळसर hint असतो. Cool स्किन टोनसाठी तुम्हाला suit होणारे बेस्ट रंग पुढील प्रमाणे:
- Royal blue
- Emerald green
- Wine
- Lavender
- Deep pink
- Pure white
- Cool-toned red
- हे रंग चेहऱ्याला freshness देतात.
कोणते रंग Cool Tone साठी योग्य नाहीत ?
- Muddy brown
- Yellowish beige
- Dull mustard
- Overly warm orange
4. Neutral Skin Tone? Lucky आहात तुम्ही
Neutral tone म्हणजे ना खूप warm, ना खूप cool. तुमच्यावर बहुतेक colours छान दिसतात. पण तरीही balance महत्त्वाचा.
तरी ही हे रंग तुमच्या स्किन टोनसाठी सेफ असू शकतात
- Teal
- Soft peach
- Dusty rose
- Navy
- Balanced reds
- Muted green
- Neutral tone मध्ये extreme shades टाळले, तर look clean दिसतो.

5. Ethnic Fashion मध्ये Skin Tone का जास्त महत्त्वाचा?
एथनिक कपड्यांमध्ये bold रंगांचा वापर जास्त असतो, जसे की लाल, हिरवा, केशरी, सोनेरी, जांभळा. जर कपड्यांचे रंग आपल्या स्किन टोनला मॅच नाही झाले तर;
- चेहरा थकलेला दिसतो
- Dark circles जास्त दिसतात
- Makeup जास्त वाटतो
- Outfit तुमच्यावर भारी वाटतो
पण जर कपड्यांचे योग्य रंग निवडले तर:
- Skin naturally glow करते
- Minimal makeup पुरेसा वाटतो
- चेहरा bright दिसतो
- Confidence visibly वाढतो
- कपडे तेच असतात, फरक फक्त मॅचिंग मध्ये असतो.
The White Paper Test (सोप्या पद्धतीने Skin Tone ओळखा)
जर तुम्हाला अजूनही तुमचा Skin Tone नक्की कळत नसेल, तर ही छोटी test करून बघा.
Prep (तयारी):
- चेहरा स्वच्छ धुवा.
- सगळा makeup काढा.
- 15 मिनिटे थांबा, जेणेकरून redness कमी होईल.
Test:
- नैसर्गिक, indirect sunlight मध्ये आरशासमोर उभे रहा.
- थेट कडक सूर्यप्रकाश टाळा.
- शुद्ध पांढरा कागद किंवा पांढरा कापड चेहऱ्याजवळ धरा.
- आरशात बघा, तुमची त्वचा पांढऱ्या रंगाच्या बाजूला कशी दिसते?

Result (निकाल):
Warm Skin Tone:
तुमची त्वचा पांढऱ्या कागदाजवळ
पिवळसर, golden किंवा peach दिसते.
Cool Skin Tone:
त्वचा गुलाबी, rosy किंवा थोडी blueish-red दिसते.
Neutral Skin Tone:
त्वचा grayish वाटते
किंवा ती जास्त yellow आहे की pink हे ओळखता येत नाही.
7. Jewellery + Skin Tone Match
जसे कपड्यांचे रंग मॅच करणे गरजेचे आहे, तसेच कोणत्या धातूची jewellery सूट करते, हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
- Warm tone → Gold, antique finish
- Cool tone → Silver, oxidised
- Neutral → Both
- Ethnic look मध्ये jewellery tone mismatch झाला, तर look off वाटू शकतो.
8. Trend Colour vs Your Colour
प्रत्येक वर्षी “colour of the year” जाहीर होतो. पण तो colour तुमच्यासाठी perfect असेलच असं नाही. Trend follow करणं सोपं आहे. पण स्वतःवर काय शोभतं ते समजून घेणं powerful आहे.
फॅशन बदलत राहते पण स्किन टोन बदलत नाही
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट
योग्य रंग म्हणजे महाग outfit नाही. योग्य रंग म्हणजे तुमचा confidence. जेव्हा colour match बरोबर असतो: तुम्ही comfortable वाटता, Outfit effortless वाटतो, लोक कपड्यांपेक्षा तुमच्याकडे बघतात आणि खरी स्टाइल तिथेच सुरू होते ![]()







Comment (1)
[…] आपल्या स्किनटोन नुसार कोणत्या रंगाचे… […]