Gudhi Padwa procession — women on bikes in Nauvari, confident, joyful. Caption: "Brand Maratha प्रस्तुत — गुढीपाडवा 2026

गुढीपाडव्याला नऊवारी नेसायची आहे ? पण नेसवणार कोण? हे वाचा

गुढीपाडव्याची सकाळ असते. उत्साह असतो. नऊवारी घालायची असते. पण घरात आई-आजी नसेल, शेजारच्या काकू busy असतील आणि YouTube वर tutorial बघून नऊ वार नेसणं इतकं सोपं सुद्धा नाही.

मुंबईत न्यूक्लियर फैमिली मध्ये राहणाऱ्या, job आणि college मध्ये व्यस्त असणाऱ्या Millennial आणि Gen Z मुलींसाठी ही एक common reality आहे. नऊवारी नेसायची असते पण नेसवणारं कोणी नसतं आणि मग त्या दिवशी मनात एक हुरहूर राहते.

पण आता ही हुरहूर संपली आहे.

Ready to Wear Nauvari — म्हणजे आधीच stitched, आधीच pleated नऊवारी साडी. ती घालायला salwar सारखी असते. Step in करायचं, pallu व्यवस्थित करायचा आणि अवघ्या २ मिनिटांत authentic नऊवारी look ready.

कोणाची मदत नाही. Pin चा गुंता नाही. Tutorial मध्ये वाया जाणारा वेळ नाही आणि नव वर्ष स्वागत यात्रेत बाइकवर जातानाही comfortable.

A Happy woman comfortable riding bike in Gudhi Padwa Procession Shakti Pathak Girgaon Smiling Woman
झटपट तयार झालेली मुलगी, शक्ती पथक, गिरगाव

गुढीपाडव्याला बाइकवर नऊवारी — Ready to Wear का जास्त Practical?

मुंबईच्या गुढीपाडवा मिरवणुकीत स्त्रीशक्ती पथकामध्ये बाइक वर आरूढ स्त्रिया आणि त्यांचा समूह हा एक महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक पद्धतीने नेसलेली नऊवारी बाइकवर handle करताना कास्ता सुटण्याची भीती असते. पदर सांभाळायला एक हात busy असतो आणि मग राईड गैरसोयीची होत असते.

Ready to Wear Nauvari मध्ये हे सगळं होण्याची शक्यताच नाही कारण ती stitched आणि secure असते. दोन्ही हात मोकळे असतात. मिरवणुकीत पूर्ण उत्साहाने सहभागी होता येतं.

पारंपरिक नऊवारीचा आत्मा असला तरी परंपरा आधुनिक सोयीसोबत असणे ही आजच्या काळाची गरज आहे.

गुढीपाडव्यासाठी 5 Best Ready to Wear Nauvari Brands

1. Peshwai Nauwar — या क्षेत्रातलं सर्वात जुनं आणि विश्वासू नाव

peshwainauwar.com | इंस्टाग्राम: @peshwainauwar

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Peshwai Nauwar (@peshwainauwar)

Ready to Wear Nauvari च्या जगात जर एकच नाव घ्यायचं असेल तर ते Peshwai Nauwar. 1994 साली Nagpur च्या पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी हा brand सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत एकही compromise नाही. गोष्ट अशी की Padma यांनी त्यांच्या लहान मुलीसाठी एक stitched नऊवारी बनवली, एका लग्नात घालायला. ती नऊवारी बघून इतक्या जणींनी विचारलं “हे कुठे मिळेल?” की त्यातूनच Peshwai Nauwar चा जन्म झाला.

त्यांचा सर्वात मोठा claim आणि तो खरा आहे “आमची नऊवारी घातल्यावर कोणालाही कळत नाही की ती pre-stitched आहे.” जशी आजी किंवा आई नेसवते, अगदी तशीच ती दिसते. काशता, ocha, pallu सगळं authentic. खालचे पाय उघडे राहणार नाहीत याची विशेष काळजी घेतली जाते.

त्यांच्याकडे वेगवेगळ्या styles आहेत पेशवाई स्टाईल, मराठा स्टाईल, मस्तानी स्टाईल, लावणी स्टाईल. प्रत्येक style चा drape वेगळा, प्रत्येकाचा occasion वेगळा. गुढीपाडव्यासाठी पेशवाई किंवा मराठी स्टाईल सर्वात योग्य आहे. हा ब्रँड 2019 मध्ये Vidarbha Industries Association च्या Women Entrepreneur Award मध्ये Top 3 finalists मध्ये होते.

2. Avani’s Nauvari — Instagram वर सर्वात Popular Choice

इंस्टाग्राम: @avanisnauvari

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swati Limaye (@swatilimayeofficial)

Avani’s Nauvari हे नाव Instagram वर Ready to Wear Nauvari शोधणाऱ्या प्रत्येकाने बघितलेलं असतं. Millennial buyers मध्ये या brand ची word of mouth खूप strong आहे.

Different designs, different fabrics, different price points, त्यामुळे budget कुठलाही असला तरी Avani’s कडे option असतो. Traditional Paithani border असलेली नऊवारी असो किंवा contemporary printed fabric, variety मध्ये Avani’s आघाडीवर आहे.

Instagram वर DM करून order करता येतो. गुढीपाडव्याच्या आधी order केलं तर वेळेत delivery होते. त्यांच्या Instagram वर customer photos बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येते — प्रत्येक customer genuinely खूश दिसते. हे brand चं सर्वात मोठं certificate आहे.

3. Shrutived Creation — Traditional Look, Online Worldwide

इंस्टाग्राम: @nauvari_saree_

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝑀𝒶𝓃𝒿𝒾𝓇𝒾 𝒮𝒶𝓉𝓌𝒾𝓁𝓀𝒶𝓇 (@msatwilkar02)

“Helping you experience the culmination of rich traditional wear” — हे त्यांचं tagline आहे आणि ते खोटं नाही.

Shrutived Creation हा brand specifically traditional authentic look साठी dedicated आहे. Modern fusion नाही, पारंपरिक महाराष्ट्रीय नऊवारी ड्रेप. त्यांच्या प्रत्येक पोस्ट मध्ये एक कन्सिस्टेंसी आहे, traditional, dignified, beautiful.

गुढीपाडव्यापूर्वी order करायचा असेल तर आत्ताच DM करा, festival season मध्ये demand वाढते म्हणून लवकरात लवकर ऑर्डर करा.

5. Geeta Readymade Nauvari — Simple, Accessible, Honest

इंस्टाग्राम: @geeta_readymadee_nauvari

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Geeta Readymade Nauvari | Navi Mumbai (@geeta_readymadee_nauvari)

सगळ्यात सोपा ऑप्शन. First time Ready-to-Wear Nauvari घालणाऱ्यांसाठी ‘Geeta Readymade Nauvari’ एक honest, straightforward choice आहे.

जास्त फ्रील्सची आवड नसणाऱ्यांना यांची साडी नक्की आवडेल. Fancy packaging नाही. फक्त एक गोष्ट — कम्फर्टेबल, रेडी-टू-वेअर अगदी रास्त दरात. ज्यांना सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन.

बजेट कॉन्शियस असणाऱ्या college students किंवा first job वर असणाऱ्या young Maharashtrian मुलींसाठी, हा brand specifically relevant आहे. Instagram वर contact करून order करता येते.

कोणता Brand तुमच्यासाठी?

  • पहिल्यांदाच Ready to Wear Nauvari घेतोय — Peshwai Nauwar. सर्वात authentic. सर्वात experienced. Mumbai store visit करता येतं.
  • Instagram वर variety बघायची आहे — Avani’s Nauvari. Best online shopping experience.
  • Budget कमी आहे — Geeta Readymade Nauvari. सहज आणि सोपी.
  • Traditional Purist look हवा आहे — Shrutived Creation. Authentic traditional style.

एक महत्त्वाची गोष्ट, आधी Order करा

गुढीपाडवा मार्च 22 ला आहे. Delivery साठी 3 ते 7 दिवस लागतात. Festival season मध्ये demand वाढते, तुम्हाला हवी असलेली Size unavailable होऊ शकतो.

आज order करा — गुढीपाडव्याच्या दिवशी tension free राहा.


नऊवारी घाला, महाराष्ट्राशी जोडलेले राहा

नऊवारी फक्त एक साडी नाही. ती महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे. मराठा साम्राज्यातल्या पेशवे स्त्रियांपासून आजच्या मुंबईच्या working women पर्यंत — नऊवारीने नेहमीच strength आणि grace एकत्र आणली आहे.

Ready to Wear Nauvari म्हणजे आपल्याच परंपरेला modern life मध्ये जगू देण्याचा एक सोपा मार्ग आहे.

आई-आजी नसली, काकू बिझी असल्या तरी नऊवारी मध्ये मिरवणं हमखास शक्य आहे, आणि परंपरा जगताना आपल्या मित्र-मैत्रिणीना आधुनिकतेमुळे झालेला बदल सांगायला विसरू नका.

गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत, नऊवारीत, बाइकवर, पूर्ण अभिमानाने नव-वर्षाचे स्वागत करूया.

हा नवा महाराष्ट्र आहे 🧡


या Brands ला Follow करा:


📱 Instagram: @brandmarathasocial 🎥 YouTube: Brand Maratha 🔗 Store: brandmaratha.store

Comments (2)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Your cart is currently empty!.

You may check out all the available products and buy some in the shop.

Continue Shopping
Add Order Note
Estimate Shipping