उन्हाळा, मिरवणूक आणि पारंपरिक कपडे, एक किचकट कॉम्बिनेशन आहे. गुढीपाडवा आला की उत्साह असतो. नवीन कपडे घालायचे असतात. Traditional look करायचा असतो. घरातून निघताना सगळं perfect दिसतं.
पण मिरवणूक सुरू होते आणि मार्चची दुपार आणि कडकडीत उन्हाळा त्या उत्साहावर हळूहळू पाणी ओतायला सुरू करतं. भरजरी साडी. भारी दागिने. सिंथेटिक लायनिंग असलेला ब्लाऊज (blouse). डोक्यावर उन आणि पायाखाली गरम डांबरी रस्ता. हा अनुभव फक्त तुमचा नाही. गुढीपाडव्याला मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीचा आहे.

उन्हाळा, मिरवणूक आणि पारंपरिक पेहराव, एक किचकट कॉम्बिनेशन
समस्या नक्की कुठे आहे हे समजून घेऊया. पारंपरिक महाराष्ट्रीय फॅशन मध्ये काही fabrics असतात जे genuinely heavy असतात आणि ते पारंपरिक असल्याने असायला ही हवेत. ऑथेंटिक पैठणी, नऊवारी, सोनेरी भरजरी काठ, हे सगळं एखाद्या बंद हॉल मध्ये, संध्याकाळच्या कार्यक्रमात, AC च्या सान्निध्यात अगदी stunning आणि comfortable दिसतं.
पण गुढीपाडवा वेगळा आहे.
गुढीपाडव्याची मिरवणूक असते, ती रस्त्यावर असते, सकाळी सुरू होते ती दुपारच्या उन्हात संपते. हे Street celebration असल्याने त्याच्या outfit चा विचार वेगळ्या प्रकारे करायला हवा. पारंपरिक असणं आणि heavy असणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्राकडे असे fabrics आहेत जे शंभर टक्के Traditional आहेत आणि त्याचवेळी उन्हाळ्यात breathable, lightweight, आणि genuinely comfortable आहेत, फक्त त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही.
गुढीपाडव्यासाठी महाराष्ट्राचे बेस्ट Summer Fabrics
1. Karvat Kathi Cotton — उन्हाळ्याचा सर्वोत्तम मित्र
Vidarbha च्या या handwoven cotton fabric मध्ये एक natural quality आहे, ती breathe करते. शरीराची उष्णता बाहेर जाते. घाम शोषला जातो. आणि तरीही fabric crisp आणि structured दिसते.
Karvat Kathi cotton साडी किंवा kurta set, गुढीपाडव्याच्या मिरवणुकीसाठी perfect choice आहे. Traditional आहे. Maharashtrian आहे. आणि दुपारच्या उन्हात तुम्हाला comfortable ठेवेल.
View this post on Instagram
2. Khun Fabric — Maharashtra चं Most Underrated Summer Fabric
खण हे जरी कर्नाटकातून येत असलं तरी ते महाराष्ट्रातल्या मातीत आणि मनामनात रुजलेलं आहे. हातमागावर तयार, Lightweight. कॉटन आणि सिल्कचं अप्रतिम blend. याचं texture इतकं unique आहे की ते घातल्यावर skin ला अजिबात heavy वाटत नाही.
खणचा kurta set किंवा कंटेम्पररी saree drape, हे आधुनिक मराठी स्त्रीसाठी गुढीपाडव्याचा सर्वात कम्फर्टेबल आणि स्टाइलिश option आहे.
3. Chanderi — साडी घालायची आहे पण हलकी हवी आहे?
Pure पैठणी heavy असते आणि ती असायलाच हवी. त्याचं वजन, त्याची शान, त्याचा इतिहास सगळं त्या fabricच्या weight मध्ये आहे. पण गुढीपाडव्याच्या मिरवणुकीसाठी एक alternative आहे — Chanderi.
Chanderi base वर Paithani motifs असलेली ही साडी खूप lightweight असते. Traditional Paithani सारखीच दिसते — पण उन्हाळ्यात comfortable असते. Traditional look कायम राहतो — आणि उन्हाचा त्रास कमी होतो.

Smart Styling Tips — Outdoor Festival साठी
Fabric बरोबरच काही styling choices आहेत ज्या गुढीपाडव्याचा outdoor experience pleasant करतात.
Jewellery हलकी निवडा Heavy gold sets beautiful असतात पण मिरवणुकीत त्यांचं weight जाणवतं. पारंपरिक पेहरावासाठी हलके चांदीचे किंवा oxidised jewellery, Kolhapuri style pieces — तितकीच elegant दिसते आणि खूप comfortable असते.
Footwear — Kolhapuri — Mandatory गुढीपाडव्याला Kolhapuri chappal हे केवळ traditional नाही, ते practical आहे. फ्लॅट. Breathable. Maharashtrian. High heels outdoor procession मध्ये — हे combination कधीही comfortable नसतं.
Blouse fabric important आहे अनेकदा साडी lightweight असते — पण blouse synthetic fabric चा असतो. Blouse साठी cotton किंवा natural fabric निवडा. Breathability साडी पेक्षा blouse मधून जास्त येते.
Dupatta किंवा Stole — Dual Purpose Traditional look साठी light cotton dupatta किंवा Khun stole, हे sun protection पण देतं. Style आणि practicality एकत्र.

पुरुषांसाठी — पण Summer Friendly कपडे असतात
गुढीपाडव्याला पुरुषांचा traditional look म्हणजे Dhoti, Kurta, Pheta.
Kurta — Cotton किंवा Linen. White, Off-white, किंवा light saffron, पेस्टल रंग असू शकतात. Heavy Weight silk kurta उन्हाळा आणि बाहेरच्या कार्यक्रमासाठी uncomfortable असतो.
Dhoti — हलक्या रंगाची कॉटन धोती, जितकं पारंपरिक तितकंच Breathable.
Traditional म्हणजे Heavy नाही — हे महाराष्ट्राला माहीत असायला हवं
महाराष्ट्राचं handloom tradition हे हजारो वर्षे जुनं आहे. आणि त्या tradition मध्ये — उन्हाळ्यासाठी वेगळे fabrics, हिवाळ्यासाठी वेगळे fabrics — हा विचार नेहमीच होता.
Karvat Kathi, Khun, Chanderi — हे fabrics उन्हाळ्यासाठीच बनवले गेले होते. आपण विसरलो. Fast fashion ने सांगितलं — “हे जुनं आहे.” आपण ऐकलं.

गुढीपाडवा हा perfect moment आहे — Maharashtra च्या summer fabrics ला त्यांची जागा परत देण्याचा.
Traditional घाला. Comfortable राहा. मिरवणुकीत पूर्ण उत्साहाने सहभागी व्हा.
भारत विविध ऋतूंनी बहरलेला देश आहे, ऋतू प्रमाणे कपडे आणि त्यात येणारे सण याची योग्य सांगड घालून केलेला पेहराव आपल्या सणांची रंगत वाढवतं, जसं पुरणपोळी दिवाळी मध्ये नाही खात, चकली-करंजी होळी मध्ये नाही खाल्ली जात, आणि तिळगुळ गणेश चतुर्थीला नसतात, त्याच प्रमाणे कपडे परिधान करताना ऋतूचा विचार केला तर गुढीपाडवा celebration अजून रंगतदार होईल, यात शंका नाही.
Lightweight Maharashtrian Festival Collection बघण्यासाठी: brandmaratha.store
📱 Instagram: @brandmarathasocial
🎥 YouTube: Brand Maratha







Comment (1)
[…] “गुढी पाडव्याच्या उन्हात comfortable राहायला कपडे सुद्धा तसेच पाहिजे, जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा […]