स्क्रीनवर दिसणारी साडी आणि तुमच्या हातात येणारी साडी, दोन्ही सारखीच असतात का? पैठणी online खरेदी करणं म्हणजे फक्त shopping नाही. तो एक emotional decision असतो. पैठणी ही आपल्या आईची साडी होती, लग्नातली साडी होती, पहिल्या दिवाळीची साडी होती, किंवा स्वत:साठी घेतलेली पहिली ‘Real Silk’ साडी होती.
पण एक uncomfortable प्रश्न विचारूया.
जी साडी तुम्ही स्क्रीनवर पाहता, ती खरंच तशीच तुमच्या हातात येते का? ऑनलाइन वर केलेली खरेदी केलेली पैठणी (Paithani) साडी खरंच अस्सल असते का?
जगभरातल्या प्रत्येक मराठी घरात ‘पैठणी’ साड्या आवडीने नेसल्या, जोपासल्या जातात. या साडीची मागणी, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा असल्यामुळे आज online market मध्ये “पैठणी” हा शब्द खूप loosely सर्रास कुठे ही वापरला जातो आणि इथेच confusion सुरू होतो.
३ प्रकारच्या “पैठण्या”
बाजारात मिळणाऱ्या सर्व साड्या पैठणी नसतात, पण सगळ्या पैठणी म्हणूनच विकल्या जातात.
1️⃣ Authentic Handloom Paithani
- येवला / पैठण हातमाग
- Pure silk warp आणि weft
- Real zari
- Price साधारण ₹10,000 पासून पुढे मिळतात. सर्व साधारण एक बेसिक पैठणी विणायला एका कारगिराला 15-20 दिवस लागतात. प्रत्येक विणकर दिवसाला 2 इंच साडी विणतो. प्रत्येक दिवसाची त्याला 200-300 रुपये मजुरी मिळते. 15 दिवसाच्या कामासाठी जर एका विणकराला ₹4500-5000 मिळत असतील तर ब्रँड त्यावर मार्जिन, डिलीवरी कॉस्ट, इत्यादी लावून ती ₹10,000 पासून विकायला सुरू करतो.
- ही heirloom category आहे.
2️⃣ Semi-Paithani
- Silk mix
- Machine-assisted weaving
- Price ₹8,000–₹20,000
- या साड्या खोट्या नाहीत, पण त्या handloom सुद्धा नाहीत.
3️⃣ Powerloom Paithani Style Saree
- Art silk / polyester
- Printed पल्लू
- Price ₹2,500–₹7,000
Problem तेव्हा सुरू होते, जेव्हा Powerloom Paithani Style साडीला handloom साडी म्हणून विकली जाते.
Online Platforms वर Description वाचताना काय पाहायचं?
आजची तरुण पिढी फक्त ऑनलाइन वस्तू विकत घेत नाहीत, ते रीतसर रिसर्च करतात. म्हणून तुम्ही सुद्धा Online Shopping करताना, Product description वाचायची सवय ठेवा, Product Description मध्ये हे शब्द दिसले तर alert व्हा:
- “Paithani Inspired”
- “Paithani Look”
- “Banarasi Paithani”
- “Soft Silk Paithani”
कारण Authentic seller स्पष्ट त्याच्या products बद्दल स्पष्ट लिहित असतो, हे असे पुढील शब्द:
- Handwoven
- Yeola Paithani
- Pure Silk
- Real Zari
Marketing शब्द चमकदार असतात. सत्य साधं असतं.
व्हिडीओ कॉल वर Border तपासा
खऱ्या पैठणीला ओळखण्याच्या काही लकब असतात, त्यातील काही गोष्टींचा वापर करून तुम्ही खरी पैठणी ओळखू शकतात, जसे की:
- पल्लूवर intricate motif असतात
- मोर, कमळ, अशा traditional आकृत्या स्पष्ट दिसतात
- मागील बाजू neat असते
Powerloom मध्ये pattern repetitive वाटतो. Design flat दिसतो. व्हिडिओ कॉल करून तुम्ही दुकानदार किंवा विणकरकडून साडी दाखवण्याचा आग्रह करू शकतात. ही एक smart buyer ची सवय आहे.
“Too Perfect” म्हणजे मशीन
Handloom मध्ये slight irregularity असते. हीच खरी मानवी हाताची खासियत आहे. जर साडी खूपच Perfectly Symmetrical वाटत असेल, तर ती machine-made असण्याची शक्यता जास्त आहे. Authenticity मध्ये नेहमी flaws असू शकतात, म्हणूनच ती कला या स्वरूपात जिवंत असते.
Colour Reality Check
online साडी घेताना मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा colour आणि खऱ्या साडीच्या रंगात कमालीचा फरक असू शकतो. मग तो फरक ओळखण्यासाठी काय करावं?
- Natural light video आहे का?
- Without filter photo आहे का?
- Shade exact कोणता आहे?
- Especially Bridal Paithani घेताना Colour Mistake costly पडतो.
Fake Discounts — सगळ्यात मोठा Trap
आपण बऱ्याच वेळेला ऑफर्स पाहतो, तशाच ऑफर्स जर आपण हँडलूम पैठणीवर पाहात असाल तर विचार करायला हवा, उदाहरण द्यायचं तर ₹65,000 साडीच्या MRP वर ऑफर असते ₹18,999. हे पाहून ती साडी घेण्यासाठी dopamine नक्कीच वाढतो. पण विचार करा.
साडीला लागणाऱ्या सिल्क + zari + labour cost धरून खरंच एवढं discount शक्य आहे का?
Huge discount हा emotional trigger असतो. पण Smart buyer कधी ही अशा थापांमध्ये अडकून पैसे गुंतवत नाही, या उलट calculation करतो.
Direct Weaver की Middle Reseller?
आपण स्वतःच वेबसाइट किंवा ऍपवर त्या प्रॉडक्टच्या डिस्क्रिप्शन आणि फोटो मध्ये चेक करा:
- Loom photos आहेत का?
- Weaver collaboration mention आहे का?
- Origin clearly सांगितलं आहे का?
- Honest brand कधीच source लपवत नाही.
Weight विचारणं लाजिरवाणं नाही
Authentic paithani तशी थोडी जड असते. त्याचं वजन साधारणपणे 1.2–2.5 kg दरम्यान असू शकतं. त्या बद्दल वेंडर किंवा सेलर बरोबर चर्चा करा, ओघात त्याला साडीचे वजन विचारा, जर seller weight सांगायला तयार नसेल, तर या साडीचा तुम्ही घेण्याआधी विचार करायला हवा.
Pure Silk लिहिलंय म्हणजे खरंच Pure असतं का?
आपण अनेक वेबसाईट्स वर “Pure Silk” लिहिलेलं वाचलं असेल, पण आपल्याला कधी ते खरंच Pure आहे असा प्रश्न पडला का? आणि जर का साडी Pure Silk असेल तर त्याचा पुरावा काय?
हे तपासण्यासाठी सांगितलेल्या गोष्टी पाहत जा:
- Silk Mark certification आहे का?
- Product description स्पष्ट आहे का?
- Fabric composition दिली आहे का?
- जर फक्त “Premium Quality” इतकंच लिहिलं असेल, तर सावध राहा.

Return Policy हे खरंतर Confidence Indicator असतं
आपण प्रत्येक वेबसाईटची रिटर्न पॉलिसी (Return Policy) नीट वाचली पाहिजे. त्यातील शब्दातून आपल्याला विविध संकेत मिळत असतात, त्याचे अर्थ समजण्यासाठी ते पुरेसे असतात. या पॉलिसी त्यांनी विकणाऱ्या प्रॉडक्ट बरोबर सलग्न असतात, त्या पॉलिसी मार्फत प्लेटफॉर्मचा आपल्या वस्तूंबद्दल किती विश्वास आहे हे दिसत असतं. पुढे दिलेल्या वाक्यातून अर्थ कसे निघतात ते समजून घ्या.
- High Value Saree आहे, ही Clarity असणं आवश्यक आहे.
- “No return on silk” लिहिलं असेल, तर प्रोडक्टवर भरोसा नसल्याने risk तुमच्यावर येतो.
- Authentic brand confident असतो. तो आपल्या शब्दातून transparency देत असतो.
Final Thought
आपल्या सर्वांना आवडणारी आपल्या प्रतिष्ठेवही पैठणी ही Impulse buy कधीच नसली पाहिजे. जेव्हा ती heirloom असते तेव्हा अनेक हाताने ती बनली असते म्हणूनच ती साडी महाराष्ट्राची असते, आपली असते.
Screen वर दिसणारी साडी आणि तुमच्या हातात येणारी साडी सारखीच असावी हे ensure करणं तुमच्या हातात आहे. वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही योग्य साडी घेऊन आपली फसवणूक टाळू शकता.
पुढच्या वेळी “Buy Now” करण्याआधी स्वतःला तीन प्रश्न विचारा:
- ही handloom आहे का?
- Fabric exactly काय आहे?
- Seller उघड पणे या साडीची माहिती देतो आहे का?
जर तीनही उत्तरं clearly हो असतील, तर तुम्ही फक्त साडी नाही, तुम्ही एक परंपरा निवडत आहात.
अलीकडेच कापसे पैठणी यांनी मराठी फॅशन वीक २०२५ मध्ये सहभाग घेतला. या फॅशन शोमधील कापसे पैठणीच्या देखण्या आणि राजेशाही लुक्सची ही खास झलक ![]()










Comments (2)
[…] […]
[…] “Online Paithani fraud कसा टाळायचा” → Online Paithani Fraud Guide […]